ज्ञानेशकुमारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा

ज्ञानेशकुमारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
Published on: 

ज्ञानेशकुमारांनी जबाबदारी
स्वीकारून राजीनामा द्यावा!
निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारावरून सुप्रिया सुळे यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारावरून इंडिया आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (ता. ८) केली.

कल्याण येथे एका खासगी कार्यक्रमासाठी जात असताना मुलुंड चेकनाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुळे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘फॉर्म क्रमांक सहा’बाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. संबंधितांना कोणतीही माहिती न देता निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप सुळे यांनी केला. नियम, कायदा आणि संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेतले जात असतील, तर देशातील घटनात्मक व्यवस्थेलाच धोका निर्माण होतो, असे त्या म्हणाल्या. ‘ईव्हीएम हटाव’ची मागणी कायम असून, निवडणूक प्रक्रियेत मूलभूत बदल करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाला भेटण्यापासून विरोधकांना रोखले जाते, पदयात्रा काढताना पोलिसांकडून अडविण्यात येत असून प्रश्न विचारण्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com