सौदीतील तणावाचा विमानसेवेला फटका

सौदीतील तणावाचा 
विमानसेवेला फटका
Published on: 

सौदीतील तणावाचा
विमानसेवेला फटका

रियाधची उड्डाणे १० ऑक्टोबरपर्यंत रद्द

नवी दिल्ली, ता. ८ : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया, इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने रियाधला जाणारी आणि रियाधहून सुटणारी उड्डाणे १० ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत. प्रवाशांना तिकिटाचा पूर्ण परतावा किंवा विनामूल्य प्रवासाचे पुनर्नियोजन करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. लुफ्थांसा समूहानेही रियाधची उड्डाणे १६ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

इराणसमर्थित हौथी बंडखोरांनी अलीकडच्या काळात सौदी अरेबियातील विमानतळ, लष्करी तळ आणि तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. गुरुवारी सकाळी रियाधच्या दिशेने हल्ला केल्याचा दावा हौथींनी केला. रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळानेही प्रवाशांना विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून उड्डाणाची सद्यःस्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी सौदीच्या राजधानीत अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानातून धूर निघताना दिसल्याचेही वृत्त आहे.

जागतिक विमान वाहतूक निरीक्षण करणाऱ्या फ्लाइटरडार२४च्या माहितीनुसार, गुरुवारी रियाधला जाणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. विमान वाहतूक विश्लेषण कंपनी सिरियमच्या आकडेवारीनुसार, भारतीय वेळेनुसार गुरुवारी सायंकाळपर्यंत रियाध विमानतळावरून होणाऱ्या सुमारे ४९.७ टक्के उड्डाणे रद्द झाली होती. शुक्रवारी सौदीतील विविध विमानतळांवर आणखी ३१ उड्डाणे रद्द होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com