वसईकर उकाड्याने घामाघूम

वसईकर उकाड्याने घामाघूम
Published on: 

वसईकर उकाड्याने घामाघूम
महत्त्वाच्या मार्गांवरील कोंडीमुळे नागरिक हैराण
वसई ता.९ (बातमीदार)ः वसईतील अनेक मार्गावर रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक मार्गावर वाहनाची वर्दळ वाढल्याने इच्छितस्थळी जाताना वसईकर घामाघूम होत आहेत.
वसई पश्चिम भागातील अंबाडी, स्टेशन परिसर, पापडी वसई गावापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका, रिक्षाचालक, प्रवासी, दुचाकीस्वारांना बसत आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका, दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जाणारी अग्निशमन वाहने अशा अत्यावश्यक सेवांना देखील फटका बसत आहे.
---------------------
बेशिस्त चालकांमुळे मनस्ताप
वसई-विरार शहरात उष्णतेचा पारा ३६ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. अशातच अनेक मार्गावरील कोंडीने वाहन चालकांना नाकीनऊ येत आहेत. वाहतूक विभागाचे कर्मचारी कोंडीच्या मार्गावर तैनात असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी काम करत आहेत. परंतु विरुद्ध दिशेने किंवा पुढे जाण्याची घाई करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत आणखीणच भर पडत आहे.
------------------
आठवडे बाजाराचा परिणाम
वसई पश्चिमेकडील पापडी येथे शुक्रवारी आठवडे बाजार असतो. त्यामुळे खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. वाहने रस्त्याच्या कडेला लावली जातात. अशातच वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे.
-----------------
वसई ते वसई गाव हा प्रवास कोंडीमुळे कठीण होतो. अशातच उष्णतेचे चटके सहन करावे लागतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावे.
-प्रदीप विचारे, नागरिक, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com