

अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पोलिसांची मोहीम
खरवली आदिवासीवाडीत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती
माणगाव, ता. ९ (वार्ताहर) : माणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूविक्रीविरोधात कारवाई सुरू असतानाच नागरिकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत खरवली आदिवासीवाडीत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगत ग्रामस्थांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले.
दारूच्या सेवनामुळे आरोग्य, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक संबंधांवर होणाऱ्या परिणामांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. दारूचे सेवन टाळून व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले.
या कार्यक्रमात माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती आंधळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाला पोलिस उपनिरीक्षक जालिंदर देवकुले, पोलिस हवालदार पाटील, उभारे, पोलिस पाटील सुजाता सुरेश तेलंगे, उपसरपंच चंद्रा संजय जगताप, अध्यक्ष हरिश्चंद्र महादेव मुकम आणि खरवली हायस्कूलचे शिपाई मंगेश गणपत जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
व्यसनमुक्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
अवैध दारूसाठे आणि विक्रीविरोधातील कारवाईसोबतच व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. या उपक्रमामुळे नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढून विश्वासाचे नाते दृढ होण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व आदिवासी वाड्या-वस्त्यांमध्ये अवैध दारूविरोधातील कारवाई आणि व्यसनमुक्तीविषयक जनजागृती सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक मारुती आंधळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.