

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरातील दत्तनगरमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप एका पित्याने केला आहे. आपली दोन मुले व्यसनाच्या आहारी गेल्याने हतबल झालेल्या पित्याने अन्य पालकांच्या मुलांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मात्र, वारंवार तक्रार करूनही अमली पदार्थांच्या तस्करांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पित्याच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा अमली पदार्थांच्या आहारी गेला असून, मोठा मुलगाही व्यसनाची लागण झाली आहे. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एकाची प्रकृती गंभीर झाली होती. तो तब्बल १८ तास बेशुद्ध अवस्थेत होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेनंतर मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने त्यांनी परिसरातील ड्रग्ज विक्रीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दत्तनगर परिसरात खुलेआम ड्रग्ज विक्री होत असून, अल्पवयीन मुलांनाही सहजपणे अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याचा दावा पित्याने केला आहे. ड्रग्जचा पुरवठा कुठून होतो आणि त्याची विक्री कोण करतात, यासंबंधीची माहिती आपल्या मुलाने पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही संबंधितांविरोधात कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अमली पदार्थांविरोधात कल्याण परिमंडळाच्या तीन क्षेत्रांमध्ये सातत्याने कारवाई होत आहे. संबंधित पित्याचे मुले अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे आम्हाला समजले असून त्यांना आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे. डोंबिवली परिसरात यापूर्वीही आम्ही कारवाई केलेली आहे. या पित्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचा योग्य तो तपास आम्ही करू.
- अतुल झेंडे, पोलिस उपायुक्त, कल्याण परीमंडळ ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.