दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आंदोलनाची हाक

दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आंदोलनाची हाक
Published on: 

दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आंदोलनाची हाक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिल्लीतील शनिवारी (ता. १०) प्रस्तावित ‘सीजेपी’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सामाजिक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. तुषार गांधी यांच्या ‘हम भारत के लोग’ या संघटनेने शुक्रवारपासून (ता.१०) ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात डाव्या संघटनांसह संविधानावर विश्वास ठेवणारे लोक सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाचे मुंबईत मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते. शिवाजी पार्क परिसरात आठवडाभर आंदोलनाने जोर धरला होता. त्यामुळे या वेळी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांकडून नोटीस मिळाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह एका कार्यकर्त्याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दोन तास ताब्यात घेतले होते, तर डाव्या संघटनांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दूरध्वनी आल्याचे सौम्या कोरडे यांनी सांगितले. दरम्यान, ऑगस्ट क्रांती मैदानात हजारोंच्या संख्येने जमून स्वातंत्र्य, सत्य आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तुषार गांधी यांनी केले आहे. मी अटकेसाठीही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जमणार असल्याचा दावा संघटनेचे प्रवक्ते अली भोजानी यांनी केला. आंदोलन करू नका, अन्यथा आम्ही ताब्यात घेऊ, असा इशारा पोलिसांनी दिला आहे, मात्र आंदोलन करणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाची धग वाढल्यास गेल्या वेळेप्रमाणे शिवाजी पार्कमध्येही आंदोलन उभ राहू शकते, असेही काही संघटनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com