कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा प्लास्टर कोसळून भाऊ-बहीण जखमी

कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा प्लास्टर कोसळून  भाऊ-बहीण जखमी
Published on: 

कल्याणमध्ये इमारतीचा
प्लास्टर कोसळले; दोघे जखमी
तक्रारी करूनही केडीएमसीने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप

कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील गणेशवाडी परिसरात धोकादायक इमारतीचे प्लास्टर अंगावर पडल्याने दोघे जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. दुचाकीवरून प्रवास करणारे ध्रुव सोळंकी आणि त्यांची बहीण प्लास्टर कोसळल्याने जखमी झाले. या घटनेत दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

शुक्ला कॉम्प्लेक्स या इमारतीजवळून जात असताना अचानक इमारतीच्या स्लॅबचा प्लास्टर दोघांच्या डोक्यावर कोसळला. गणेशवाडी परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या या इमारतीची अवस्था धोकादायक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत इमारतीचे प्लास्टर कोसळून दोन जण जखमी झाल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या धोकादायक इमारतीबाबत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य ती कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दोन जण जखमी झाल्यानंतर तरी केडीएमसी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com