

न्यायालयाच्या लिफ्टमध्ये दोन वकील तासभर अडकले
आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधूनही प्रतिसाद नाही; वकिलांचे ठिय्या आंदोलन
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : कल्याण न्यायालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्ट अचानक बंद पडल्याने दोन वरिष्ठ वकील तब्बल तासभर आत अडकून पडले. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर आपत्कालीन हेल्पलाइनवर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वकिलांची सुखरूप सुटका केली. या घटनेच्या निषेधार्थ वकील संघटनेच्या वतीने न्यायालय परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कल्याण न्यायालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्टचा वापर करीत असताना अचानक ती बंद पडली. त्यामुळे दोन वरिष्ठ वकील लिफ्टमध्ये अडकले. बराच वेळ प्रयत्न करूनही लिफ्ट सुरू न झाल्याने त्यांनी मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइनवर वारंवार संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी प्रयत्न करून दोन्ही वकिलांची सुटका केली. या घटनेमुळे न्यायालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्टची सुरक्षितता, वीजपुरवठा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लिफ्टसारख्या महत्त्वाच्या सुविधेसाठी पर्यायी वीजव्यवस्था आणि सक्षम आपत्कालीन मदत यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप वकिलांनी केला.
घटनेचा निषेध करण्यासाठी वकील संघटनेच्या वतीने न्यायालय परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा आणि लिफ्टची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक असताना अशी घटना घडणे गंभीर असल्याची भावना वकिलांनी व्यक्त केली. लिफ्टसाठी पॉवर बॅकअपची व्यवस्था करावी, अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वकिलांनी केली. यासंदर्भात संबंधित विभागांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी भूमिकाही आंदोलनकर्त्या वकिलांनी घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.