ठाणे जिल्ह्यात अवैध मद्यव्यवसायावर कारवाई

ठाणे जिल्ह्यात अवैध मद्यव्यवसायावर कारवाई
Published on: 

ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने गांधी सप्ताहानिमित्त विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत १०० जणांना अटक करण्यात आली असून, ६३ लाख १० हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे -१ विभागाने राबवलेल्या या सप्ताहात जिल्ह्यात ठिकठिकाणी छापा टाकण्यात आला. नाकाबंदी करून खबरीमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अवैध मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतुकीवर नजर ठेवून १०० जणांना अटक केली. ठाणे जिल्ह्यातील ए, बी, सी, ई, एफ, जी, एच, आय या आठ विभागांत फिरून अवैध मद्याच्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी विविध पथके तयार करून या अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांच्या मुशक्या आवळल्या.
मोहिमेदरम्यान अवैध हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रांवर छापे टाकण्यात आले. हातभट्टीची दारू, देशी-विदेशी मद्य आणि मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारी रसायने जप्त करण्यात आली. तसेच अवैध मद्यनिर्मिती केंद्रे उद्ध्वस्त करण्यावर विभागाने भर दिला.

सप्ताहात केलेली कारवाई
गुन्हे - १०४
अटक आरोपी - १००
जप्त वाहने - १४
एकूण मुद्देमाल जप्त - ६३,१०७०५
पर राज्यातील देशी मद्य - ५४०० बल्क लिटर
बनावट परदेशी स्कॉच - ३९ बल्क लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com