दर्जेदार आरोग्यसेवा द्या

दर्जेदार आरोग्यसेवा द्या
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : आरोग्य केंद्रांतील औषधसाठा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि वैद्यकीय साहित्याच्या देखभालीबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मेजर डॉ. नितीन राठोड यांनी आरोग्य विभागाला दिला. आरोग्य केंद्रांतील सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्रुटी दूर करण्यासह नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिरिक्त आयुक्त मेजर डॉ. नितीन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. १०) यूआरसीटी येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रांमधील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आरोग्यविषयक कामकाजाबाबत समाधान व्यक्त करतानाच सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक केंद्रातील व्यवस्था काटेकोरपणे तपासण्यावर त्यांनी भर दिला. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत की नाहीत, याबाबत नियमित पडताळणी करावी. कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतात की नाही, यावर लक्ष ठेवावे. तसेच केंद्रांतील वैद्यकीय उपकरणे आणि अन्य साहित्याची नियमित देखभाल-दुरुस्ती झाली आहे की नाही, याबाबत खातरजमा करावी, असे निर्देश राठोड यांनी दिले.

समस्या थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचवा
आरोग्यसेवा पुरविताना कोणतीही अडचण उद्भवल्यास ती प्रलंबित ठेवू नये. संबंधितांनी थेट अतिरिक्त आयुक्त किंवा मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून समस्येचे निराकरण करून घ्यावे, असेही निर्देश देण्यात आले. प्रत्येक आरोग्य केंद्रात नावीन्यपूर्ण आरोग्यविषयक उपक्रम राबवून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com