गणेशोत्सव संपला, खड्डे कायम!

गणेशोत्सव संपला, खड्डे कायम!
Published on: 

गणेशोत्सव संपला, खड्डे कायम!
कांदिवली-मालाडमध्ये रस्ते, पदपथांची दुरवस्था; वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
कांदिवली, ता. ११ (बातमीदार) ः गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यासाठी रस्ते व पदपथांवर खोदण्यात आलेले खड्डे हे उत्सव संपूनही अनेक ठिकाणी व्यवस्थित बुजविण्यात आलेले नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे वाहनचालक, दुचाकीस्वार, पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
मंडपासाठी रस्ता किंवा पदपथ खोदणाऱ्या गणेश मंडळांना उत्सवानंतर खड्डे योग्य पद्धतीने भरून रस्ता पूर्ववत करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या नियमानुसार अशा अनधिकृत खोदकामासाठी प्रतिखड्डा दंडाची तरतूद असून, काही प्रकरणांत हा दंड १५ हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र, दंडाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
कांदिवली पूर्वेला लोखंडवाला, पश्चिमेला एम. जी. रोड, मालाड सोमवार बाजार परिसरात बहुतांशी मंडळांचे मंडप रस्त्यावर असल्याने रस्त्यावर खड्डे पाडले आहेत. नवरात्रोत्सव सुरू झाला असून गणेशोत्सवात रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना नोटिसा बजावून त्यांच्या खर्चाने रस्ता पूर्ववत करून घ्यावा आणि निष्काळजी करणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com