कोमसापचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर प्रविण दवणे यांना कविता राजधानी पुरस्कार

कोमसापचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर
प्रविण दवणे यांना कविता राजधानी पुरस्कार
Published on: 

कोमसापचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर
प्रवीण दवणे यांना ‘कविता राजधानी’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) २०२४-२५ या वर्षाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर झाले आहेत. ठाण्याचे कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांना ‘कविता राजधानी’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

कादंबरी विभागात विवेक गोविलकर यांच्या ‘सिंफनी’ला प्रथम, तर उदय जोशी यांच्या ‘संघर्षपर्व’ला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. कथा विभागात स्टिफन परेरा यांच्या ‘काळवेळ’ला प्रथम, तर अशोक लोटणकर यांच्या ‘निराधार’ला द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे. कविता विभागात डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या ‘उडवाच मान माझी’ला प्रथम, तर विलास गावडे यांच्या ‘व्यक्त होतोय मी’ला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

आत्मचरित्र विभागात आनंद इंदिरा श्रीधर सांडू यांच्या ‘क्षण... सोनेरी... रुपेरी आणि... काटेरी’, चरित्र विभागात शामसुंदर गावकर यांच्या ‘भरती-ओहोटी’, समीक्षा विभागात डॉ. शिल्पा जोशी यांच्या ‘मंगेश पाडगावकरांचे गीत-काव्य’ आणि नाटक विभागात अरुण तुकाराम मोर्ये यांच्या ‘कृष्णा माझं काय चुकलं’ या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

ललित गद्य विभागात वर्षा कुवळेकर यांच्या ‘सफर खूबसुरत है मंजिलसे’ या ग्रंथाला प्रथम, तर नितीन तेंडुलकर यांच्या ‘अधिक उंच उडता उडता’ या साहित्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्यासह बाळ कांदळकर यांना कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार, तर प्रवीण सोनावणे यांना युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com