पूर्णेकर हत्याकांडातील टल्ली, पपलू ठाण्यात दाखल

पूर्णेकर  हत्याकांडातील टल्ली, पपलू ठाण्यात दाखल
Published on: 

पूर्णेकर हत्याकांडातील टल्ली, पपलू ठाण्यात
सोमवारी पप्प्यासह तिघांना न्यायालयात हजर करणार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील फरार संशयित संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांना प्रयागराज येथून ताब्यात घेण्यात आले. या दोघांना घेऊन ठाण्याकडे रवाना झालेले विशेष तपास पथक (एसआयटी) रविवारी (ता. ११) ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेला सुभाष ऊर्फ पप्प्या शिंदे याच्या पोलिस कोठडीची मुदतही संपत असल्याने सोमवारी या तिघांनाही ठाणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पूर्णेकर यांच्यावर २९ सप्टेंबरच्या रात्री हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. या पथकाने संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांना प्रयागराज येथील व्हीव्हीआय घाट परिसरातून ताब्यात घेत ठाण्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर शनिवारी (ता. १०) प्रयागराज येथून ठाण्याकडे एसआयटी पोलिस पथक रवाना झाले. ते पथक रविवारी दोन्ही संशयितांसह ठाण्यात पोहोचले. सोमवारी या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेत आरोपींची संख्या पाच झाली असून, या हत्या प्रकरणात पाच जणांच्या चौकशीतून हत्येच्या कटामागील नेमके सूत्रधार, हत्येचे कारण आणि अन्य सहभागींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पप्प्या, टल्ली आणि पपलू या तिघांच्या न्यायालयीन सुनावणीकडे आणि पोलिस तपासातून उघड होणाऱ्या नव्या धागेदोऱ्यांकडे लक्ष लागले आहे.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com