बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही
Published on: 

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही
दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : राज्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या कठीण परिस्थितीत बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. ११) दिली.
टेंभी नाका येथील प्रसिद्ध दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ४८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या नवरात्रोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. कळवा येथून देवीच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर टेंभी नाका येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याला शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.
राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना मंडळांना आधीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनेक मंडळांनी उत्सवाचा खर्च कमी करून उर्वरित निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणारे प्रत्येक हात महत्त्वाचे असून, सरकारही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली असून, केंद्राच्या पथकानेही पाहणी केली आहे.
------------------
शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकलींचे वितरण
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलींसाठी २५ हजार सायकली आणि महिलांसाठी २५ हजार शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com