

मुंबई, ता. १२ : परळ येथील डॉ. शिरोडकर शिक्षण संस्था बंद असल्याच्या आणि संस्थेला टाळे लागल्याच्या वृत्तांमध्ये तथ्य नसून, शाळा नियमितपणे सुरू असल्याचे स्पष्टीकरण संस्थेच्या माजी सरचिटणीस व विद्यमान कार्यकारिणी सदस्य ॲड. भक्ती जोगल यांनी दिले आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपल्या पाल्यांना नेहमीप्रमाणे शाळेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी संस्थेत घुसखोरी करून संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचे ॲड. जोगल यांनी सांगितले. या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदनही केले.
दरम्यान, काही वृत्तवाहिन्यांवर परळ येथील डॉ. शिरोडकर शिक्षण संस्थेला टाळे लागल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ॲड. जोगल यांनी, शाळा बंद झालेली नसून ती नियमितपणे सुरू आहे आणि पुढील दिवशीही नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
संस्थेचा ताबा व्यवस्थापन मंडळाकडे असून, मंडळ संस्था सुरळीतपणे चालविण्यास सक्षम असल्याचेही ॲड. जोगल यांनी नमूद केले. त्या संस्थेच्या जबाबदार कार्यकारिणी सदस्य आणि माजी सरचिटणीस या नात्याने हे स्पष्टीकरण देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांनी कोणत्याही बातमीमुळे घाबरून जाऊ नये. शाळा नियमित सुरू आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना वेळेवर शाळेत पाठवावे, असे आवाहन ॲड. भक्ती जोगल यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.