

शहापूर, ता. १२ (वार्ताहर) : हवामान बदल आणि अल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे अनेक जलाशय शहापूर तालुक्यात असतानाही येथील नागरिकांना दरवर्षी जानेवारीपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाणी ही पुढच्या पिढीसाठी जपून ठेवण्याची ठेव समजून त्याचा काटकसरीने वापर करावा आणि पावसाच्या पाण्याचे संचयन करावे, असे आवाहन सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते उदय अग्रवाल यांनी केले आहे.
परतीच्या पावसात खंड पडल्याने तालुक्यातील भातशेती आणि भाजीपाला पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर अग्रवाल हे संवाद, परिसंवाद आणि विविध जनजागृतीच्या माध्यमांतून नागरिकांना अल-निनोच्या संभाव्य परिणामांची जाणीव करून देत आहेत. शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या रब्बी पिकांना तसेच अधिक चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
येत्या काही महिन्यांत अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेता, संभाव्य ‘सुपर अल-निनो’च्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.
स्वयंशिस्त पाळणे आवश्यक
आगामी काळात पाण्याचा अपव्यय आणि गैरवापर रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. पाण्यासोबतच पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनांचा अतिवापर आणि विजेचा अनावश्यक वापरही टाळावा, असे आवाहन उदय अग्रवाल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.