शालेय शिक्षणमंत्र्यांची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट

शालेय शिक्षणमंत्र्यांची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट
Published on: 

खारघरमध्ये शिक्षणमंत्र्यांकडून शाळेची पाहणी
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतीच खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची प्रगती आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. शाळेच्या कामकाजाची पाहणी करीत त्यांनी शाळेच्या शैक्षणिक कार्याचे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यावर भर देण्याबाबत चर्चा झाली. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत होणारे बदल, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीनेही विचारविनिमय करण्यात आला.
या वेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती घेतली. याप्रसंगी माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, संस्थेचे संचालक तथा नगरसेवक परेश ठाकूर, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, सचिव डॉ. एस. टी. गडदे, शाळेच्या प्राचार्या राज अलोनी यांच्यासह नगरसेवक, संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com