

प्राण्यांशी जडली विद्यार्थ्यांची मैत्री
सकाळ एनआयईतर्फे ज्ञानप्रकाश विद्यालयात उपक्रम; प्रा. सुनील कदम यांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : जागतिक प्राणी दिनानिमित्त सकाळ एनआयईतर्फे घाटकोपर पश्चिम, भटवाडी येथील ज्ञानप्रकाश विद्यालयात शुक्रवारी (ता. ९) आगळावेगळा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांविषयी प्रेम, आपुलकी आणि सहजीवनाची भावना रुजविणे तसेच पर्यावरण आणि प्राणी यांच्यातील परस्परसंबंधांचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
प्रसिद्ध सर्पमित्र प्रा. सुनील कदम यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात प्राथमिक विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सहभाग घेतला. प्रा. कदम यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून विविध प्राण्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे जीवन आणि पर्यावरणातील महत्त्व यांची माहिती दिली. प्राण्यांशी मैत्री कशी करावी, त्यांच्याविषयी आपुलकी कशी निर्माण करावी आणि त्यांच्याशी संवेदनशीलतेने कसे वागावे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
प्राणिमात्रांवर दया करणे, त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जागरूक राहणे हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव या उपक्रमातून विद्यार्थ्यांना झाली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डी. एन. सावंत आणि शाळेच्या मुख्याध्यापिका विजया प्रभाकर सैद यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह
विविध प्राण्यांना जवळून पाहण्याची आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. काही प्राण्यांना जवळून अनुभवताना विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शहरी भागातील मुलांसाठी हा अनुभव अनोखा ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.