

वर्गांमध्ये जाऊन शिक्षणमंत्र्यांचा संवाद
वाचन, विज्ञान प्रयोग आणि कलागुणांची घेतली पाहणी
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) : ‘चला शाळेत जाऊया’ या उपक्रमांतर्गत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी (ता. ९) अलिबाग तालुक्यातील पाच जिल्हा परिषद शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी मुलांचे वाचन, शैक्षणिक प्रगती, विज्ञान प्रयोगशाळा आणि कलाकृतींची पाहणी करून शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला.
शिक्षणमंत्र्यांनी मुशेत, किहीम आदिवासीवाडी, झिराड, आवास आणि नवगाव येथील शाळांना भेट दिली. या वेळी पालकमंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी, सदस्य दिलीप भोईर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होते.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम आणि ढोलपथकाच्या गजरात शिक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांकडून वाचन करून घेत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती जाणून घेतली. या वेळी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
विज्ञान प्रयोगांना दाद
झिराड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला भेट देऊन शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोगांची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कला आणि कार्यानुभव प्रदर्शनाची बारकाईने पाहणी केली. बालवैज्ञानिकांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर
जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक गुणवत्तेसाठी केले जाणारे प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले कार्य पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.