ताडवागळे येथे शिवसेना शाखा व भव्य व्यायामशाळेचे उदघाट्न

ताडवागळे येथे शिवसेना शाखा व भव्य व्यायामशाळेचे उदघाट्न
Published on: 

ताडवागळेत व्यायामशाळा सुरू
नवीन शिवसेना शाखाही सज्ज

पोयनाड, ता. १२ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील ताडवागळे येथे नवनिर्मित भव्य व्यायामशाळा आणि शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. राजा केणी, स्वप्नील म्हात्रे आणि संकेत पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून या उपक्रमाची पूर्तता झाली.
अलिबाग पंचायत समितीचे सदस्य कृष्णा लोभी यांच्या हस्ते व्यायामशाळा आणि शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील ताडवागळे परिसरात व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध नसल्याने तरुणांना व्यायामासाठी पेझारी किंवा पोयनाड येथे जावे लागत होते. ही अडचण दूर करण्यासोबतच तरुणांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणे, आरोग्याबाबत जागरूक करणे आणि व्यसनांपासून दूर ठेवणे हा या व्यायामशाळेच्या निर्मितीमागील उद्देश आहे.
याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शिवसेनेची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. या शाखेच्या माध्यमातून नागरिकांना स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन व्यायामशाळेमुळे ताडवागळे परिसरातील तरुणांना व्यायामाची सुविधा उपलब्ध झाली असून, शिवसेना शाखेच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.


छायाचित्र :

पोयनाड : ताडवागळे येथे शिवसेनेच्या नवीन शाखेचे व व्यायामशाळेचे उदघाट्न करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com