जोगिला तलावप्रकरणी चिमुरडींच्या कुटुंबांना मदत

जोगिला तलावप्रकरणी चिमुरडींच्या कुटुंबांना मदत
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
​ठाणे, ता. १२ : उथळसर प्रभाग समिती हद्दीतील जोगिला तलावात बुडून मृत्यू झालेल्या गंगी कामी (वय ७) आणि भगवती कामी (वय ४) या बालिकांच्या कुटुंबीयांना ठाणे महापालिकेकडून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण १० लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली असून, अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.

जोगिला तलाव येथे २५ सप्टेंबरला पाण्यात बुडून दोन बालिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. हे दोन्ही कुटुंबीय अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कुटुंबातील लहान बालिकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर मोठा मानसिक आघात होऊन आर्थिक संकट ओढवले होते. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी या घटनेची माहिती देत त्यांच्या कुटुंबांना मदत करण्याची मागणी केली होती. तसेच शिवसेना गटनेते व नगरसेवक पवन कदम यांनीही पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे दोन्ही मृत बालिकांच्या कुटुंबांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत देण्याची मागणी केली होती. ​या मागणीची दखल घेत पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने मानवतावादी दृष्टिकोनातून हा प्रस्ताव तयार केला. आयुक्त स्तरावर या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com