

नवरात्रोत्सवामुळे उपवासाच्या साहित्याला मागणी
पनवेल, नवी मुंबई, वाशीच्या बाजारांत भेंडी, रताळी, कच्ची केळी, भगर, साबुदाण्याची खरेदी वाढली; काही जिन्नसांचे भाव चढेच
पनवेल, ता. १२ (बातमीदार) ः नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाल्याने आदिशक्तीच्या आराधनेसाठी उपवास करणाऱ्या भाविकांची बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रमुख बाजारांत उपवासासाठी लागणाऱ्या भेंडी, रताळी, कच्ची केळी, काशीफळ, भुईमूग शेंगा, साबुदाणा आणि भगरीच्या खरेदीला भाविकांकडून विशेष पसंती मिळत आहे. मागणी वाढल्याने बाजारात काही पदार्थांचे भावही चढेच असल्याचे दिसून येत आहे.
नवरात्रोत्सवात अनेक महिला आणि पुरुष नऊ दिवस उपवास करतात. काही जण एकवेळ भोजन करतात, तर काही जण फळे आणि उपवासाचे पदार्थ आहारात घेतात. त्यामुळे पनवेलच्या मुख्य बाजारपेठेसह नवी मुंबईतील किरकोळ बाजार आणि वाशीच्या भाजीपाला बाजारात विविध जिन्नसांची रेलचेल पाहायला मिळत आहे. नोकरदार महिलांकडून साबुदाणा, भगर आणि राजगिऱ्याच्या तयार पिठाला मागणी वाढली आहे. तसेच बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, बटाटा चिवडा आणि साबुदाणा चिवडा यांसारख्या तयार फराळाच्या पदार्थांचीही खरेदी होत आहे. नवरात्रात घरातील सर्व जण उपवास करत असल्याने साबुदाणा, भगर, रताळी आणि फळे घ्यावी लागतात. तयार पिठांमुळे वेळ वाचतो; मात्र काही पदार्थांचे वाढलेले दर पाहून खरेदीचे नियोजन करावे लागते, असे कविता फडतरे या गृहिणीने सांगितले.
उपवासाच्या विविध साहित्याचे बाजारभाव
उपवासाच्या भाज्या व फळे :
उपवासाची भेंडी : ₹८० प्रतिकिलो
रताळी : ₹६० ते ₹८० प्रतिकिलो
काशीफळ : ₹५० प्रतिकिलो
कच्ची केळी : ₹६० प्रति डझन
भुईमूग शेंगा : ₹५० ते ₹६० प्रति किलो
सिंगाडा : सुमारे ₹२०० प्रतिकिलो
धान्य, पिठे व सुकामेवा :
साबुदाणा : ₹१०० ते ₹१२० प्रतिकिलो
राजगिरा : ₹२०० ते ₹२२० प्रतिकिलो
भगर : ₹२२० ते ₹२५० प्रतिकिलो
शेंगदाणे : ₹१४५ ते ₹१६० प्रतिकिलो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.