

कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : उंबर्डे डम्पिंग ग्राउंड येथे पर्यवेक्षकाला कथित मारहाण केल्याच्या घटनेने आता गंभीर वळण घेतले आहे. आमदार सुलभा गायकवाड यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी पर्यवेक्षक किरण रसाळ यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद पडल्याने कचरा घेऊन आलेल्या घंटागाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डम्पिंग ग्राउंडच्या पाहणीदरम्यान वाद झाला. या वादात रसाळ हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. संबंधित पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत प्रकल्प सुरू न करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद पडल्याचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. आंदोलन लांबल्यास शहरात कचरा साचून स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन मिटवून कचरा प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
मद्यप्राशनाची पुष्टी करता येणार नाही!
या प्रकरणाबाबत पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, पर्यवेक्षकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याची पुष्टी करता येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर घटनेच्या वेळी पर्यवेक्षक मद्यधुंद अवस्थेत असल्याच्या दाव्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.