

धारावीत शौचालय बंद; महिलांचे हाल
कुंचीकोर्वे नगरात पाणी, गटारांच्याही समस्या कायम; तातडीने मूलभूत सुविधा देण्याची मागणी
धारावी, ता. १३ (बातमीदार) : धारावीतील कुंचीकोर्वे नगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक शौचालय बंद असल्यामुळे स्थानिक रहिवासी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकार हर घर शौचालय आणि स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा करते, तर दुसरीकडे मुंबईसारख्या विकसित शहरात नागरिकांना शौचालयायासारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. गावखेड्यांमध्ये घराघरात शौचालयाची व्यवस्था होत असताना मुंबईत राहणाऱ्या या नागरिकांच्या वाट्याला मात्र वर्षानुवर्षे हालअपेष्टा का, हा प्रश्न प्रशासनाला आणि सरकारला स्थानिक महिला विचारात आहेत.
‘पाणी नाही, शौचालय नाही, गटारांची समस्या कायम; मग सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कुणाकडे? कुंचीकोरवे नगरमधील महिलांनी आणि रहिवाशांनी आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा? डिजिटल इंडियाच्या घोषणा प्रत्यक्षात उतरवायच्या असतील, तर नागरिकांना आधी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या. प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन बंद शौचालय सुरू करावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि गटारांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. हा कोणावर उपकार करण्याचा विषय नाही, तर नागरिकांच्या सन्मानाचा, आरोग्याचा आणि मूलभूत हक्कांचा प्रश्न असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक १८८ व १८९ धारावी विधानसभा उप विभागप्रमुख गंगा देरबेर यांनी सांगितले. कुंचीकोरवे समाजातील महिलांच्या शौचालय, पाणी, गटार व इतर मूलभूत नागरी समस्यांची विचारपूस करण्यासाठी स्थानिक महिलांची गंगा देरबेर यांनी भेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.