जव्हार, मोखाड्यात शेतकरी संकटात

जव्हार, मोखाड्यात शेतकरी संकटात
Published on: 

जव्हार, मोखाड्यात शेतकरी संकटात

एकरी ५० हजारांची भरपाई देण्याची मागणी

जव्हार, ता. १३ (बातमीदार) : जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील पिकांचे नुकसान लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांना निवेदन देण्यात आले.

जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांची भात, नागली, वरई आणि उडीद ही प्रमुख पिके पावसाच्या कमतरतेमुळे बाधित झाल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. शेतीवरच उदरनिर्वाह असल्याने पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. खरीप हंगामातील उत्पन्न घटल्याने कर्जफेड आणि आगामी हंगामाच्या तयारीवरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाने दोन्ही तालुक्यांतील पावसाची स्थिती आणि पीक नुकसानीची तातडीने पाहणी करावी. नुकसानग्रस्त शेतजमिनींचे पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा आणि परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळसदृश स्थिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी, पीकविमा आणि कृषी कर्जासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com