विक्रोळीच्या ‘अंबाई’ नवरात्रोत्सवात धार्मिक, सामाजिक उपक्रमांची रेलचेल

विक्रोळीच्या ‘अंबाई’ नवरात्रोत्सवात धार्मिक, सामाजिक उपक्रमांची रेलचेल
Published on: 

विक्रोळीच्या ‘अंबाई’ नवरात्रोत्सवात धार्मिक, सामाजिक उपक्रमांची रेलचेल
घाटकोपर ता. १३ (बातमीदार) ः नवतरुण मित्रमंडळाच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात यंदा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ‘विक्रोळीची अंबाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाची स्थापना १९८१मध्ये झाली. तेव्हापासून मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. संजय परब आणि किशोर वार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्ष शारदाप्रसाद यादव आणि उपाध्यक्ष संतोष पांडे यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात येते. नऊ दिवस सुस्वर भजन, देवीची आरती आणि गरब्यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या काळात भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच विविध उपक्रमांत सहभागी होता येणार आहे.
नवरात्रोत्सवातील अष्टमीला सत्यनारायण महापूजा आणि होमहवन आयोजित करण्यात येणार आहे. या धार्मिक विधींमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दसऱ्याच्या दिवशी साईबाबांचा पालखी सोहळा आणि देवीमातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत परिसरातील भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

सामाजिक उपक्रमांवर भर
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर मंडळाचा भर असतो. रहिवासी आणि देणगीदारांसाठी मोफत नेत्रतपासणी व वैद्यकीय शिबिर आयोजित केले जाते. तसेच महिलांसाठी मोफत साडीवाटप करण्यात येते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. लहान मुलांसाठीही कला-कौशल्यविषयक उपक्रम आणि स्पर्धा घेऊन त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com