प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार; जिम प्रशिक्षकाला अटक; ७० ते ८० तरुणींना फसवल्याचा दावा

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार; जिम प्रशिक्षकाला अटक; ७० ते ८० तरुणींना फसवल्याचा दावा
Published on: 

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींवर अत्याचार
इन्फ्लुएन्सरला अटक; ८० जणींना फसवल्याचा दावा

नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी २२ वर्षीय जिम प्रशिक्षक आरिफ शेख याला अटक केली. लग्नाच्या भूलथापा देत वारंवार अत्याचार केल्याची तक्रार एका २३ वर्षीय तरुणीने केली आहे. आरोपीने अनेक तरुणींना फसवून त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्याचा आरोप तिने केला आहे. आतापर्यंत ७० ते ८० तरुणींना फसवल्याचा दावाही तिने केला आहे.
पीडित तरुणीची मागील वर्षी आरिफ शेख याच्याशी ओळख झाली होती. आरिफ हा इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर असून, जिम प्रशिक्षक म्हणूनही काम करतो. तक्रारीनुसार आरोपीने लग्नाच्या भूलथापा देत तरुणीला स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्याशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात आरिफ आणि त्याच्या आईने तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकला. तसेच तिला मारहाण केल्याचाही आरोप आहे. आरोपीचा मावसभाऊ सोहेल यानेही तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरिफ शेख, त्याची आई रुक्साना आणि मावसभाऊ सोहेल शेख यांच्याविरोधात बलात्कार, बळजबरीने डांबून ठेवणे आणि मारहाण इत्यादी आरोपांखाली सोमवारी (ता. १२) गुन्हा दाखल केला आहे.
‘‘सध्या एका पीडितेने तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये काही तरुणींचे अश्लील व्हिडिओ आढळले असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे,’’ अशी माहिती नालासोपारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली. पीडितेने केलेल्या आरोपांची सत्यता पडताळण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
...
तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ
पीडितेला आरिफच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याचा दावा तिने केला आहे. यानंतर तिने स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. आरोपी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणींना लक्ष्य करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करीत असे आणि त्यानंतर त्यांच्या अश्लील चित्रफिती अश्लील संकेतस्थळांवर विकत असे, असा आरोपही केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी मनसेचे स्थानिक नेते संजीव मेहरा यांनी केली आहे.
...
भावना भडकवल्याचा गुन्हा
नवरात्रोत्सवाच्या काळात ३० ते ४० तरुणींना जाळ्यात ओढत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य आरिफने केल्याचा त्याच्यावर आरोप असून, त्याच्या मित्राने या वक्तव्याचा व्हिडिओ चित्रित केला होता. या व्हिडिओच्या आधारे सकल हिंदू संघटनेचे शिव उपाध्याय यांच्या तक्रारीवरून रविवारी (ता. ११) आरिफविरोधात धार्मिक भावना भडकवणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com