

शास्त्रीय नृत्यातून संस्कृतीचे जतन
डॉ. पुरू दधीच यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्यांगनांचे कलाविष्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः नटरवी आणि नटनम संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील सुनकारा, डॉ. पीयूष राज यांच्या वतीने ज्येष्ठ नृत्यगुरू डॉ. पुरू दधीच यांच्या ८८व्या वाढदिवसानिमित्त ‘पुरू अर्पण २०२६’ हा विशेष कार्यक्रम बोरिवली पूर्व येथे पार पडला.
या कार्यक्रमात मुंबईतील १३८ नृत्यांगनांनी सहभाग घेतला. डॉ. सुनील सुनकारा हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री नाट्य शिक्षक असून, नटरवी आणि नटनम या दोन्ही संस्थांमार्फत भारतीय शास्त्रीय नृत्याचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दोन्ही संस्था भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. शतावरी वैद्य यांची प्रस्तुती. डॉ. वैद्य या गेली २० वर्षे बोरिवली आणि पुणे येथे भरतनाट्यमचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांना भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल पाच आंतरराष्ट्रीय, सहा राष्ट्रीय, २३ केंद्र शासकीय, चार राज्य शासकीय, १२ सांस्कृतिक आणि पाच कॉर्पोरेट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, आयर्न लेडी आणि सुपर वूमन नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाला आहे. आतापर्यंत त्यांनी ११० हून अधिक भरतनाट्यम नृत्यशैलीतील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.
डॉ. वैद्य यांची श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान ही संस्था असून, संस्थेमार्फत शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण, कोरिओग्राफी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुरू अर्पण कार्यक्रमात डॉ. शतावरी वैद्य आणि त्यांच्या शिष्यांनी ‘राम भजन’ ही नृत्यनाटिका सादर केली. या भजनाची सुंदर कोरिओग्राफी त्यांच्या गुरू श्रीमती व्यंकटरमण यांनी केली होती. या सादरीकरणात श्रद्धा भालेराव, त्रिपर्णा वैद्य, श्रावणी मिठबावकर, गार्गी नाटेकर आणि विभा चित्ते यांनी साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.