तुर्भेतील अनधिकृत बांधकामांविरोधात ‘लोक अधिकार’चे आंदोलन

तुर्भेतील अनधिकृत बांधकामांविरोधात ‘लोक अधिकार’चे आंदोलन
Published on: 

अनधिकृत बांधकामांविरोधात ‘लोक अधिकार’चे आंदोलन
एमआयडीसी आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईचे आश्वासन
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : परिसरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांविरोधात ‘लोक अधिकार एनजीओ’च्या वतीने मंगळवारी (ता. १३) प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, हनुमाननगर आणि बगाडे परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी संघटनेने केली. दरम्यान, महापालिका आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
लोक अधिकार संघटनेचे ठाणे जिल्हा प्रमुख बालकृष्ण खोपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या मागण्यांची दखल घेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी विनोद आमरे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारात चर्चा केली. एमआयडीसी आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने येत्या काही दिवसांत संबंधित परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन आमरे यांनी दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

ठिय्या आंदोलनांचा इशारा
महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांकडे याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे खोपडे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com