विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला व्यासपीठ

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला व्यासपीठ
Published on: 

मुंबई, ता. १४ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, त्यांच्यातील संशोधनवृत्तीला चालना देणे आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबईतील विविध वॉर्डांमध्ये वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाकडून अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत मानखुर्द येथे ५४व्या वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बुधवारी (ता. १४) उद्घा‌टन करण्यात आले. हे प्रदर्शन शुक्रवारी (ता. १६)पर्यंत नूतन विद्या मंदिर, मानखुर्द येथे भरविण्यात येणार असून, मुंबईतील विविध वार्डांमध्येही हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

या प्रदर्शनात एम-पूर्व वॉर्डातील सुमारे १०० शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले असून, विविध वैज्ञानिक प्रकल्पांच्या माध्यमातून ते आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवणार आहेत.

कौशल्ये विकसित होण्यास मदत
मुंबईतील विविध वॉर्डांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनांमुळे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक कल्पना आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळत आहे. वॉर्डस्तरावर होणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांतून समजून घेता येतात. तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे, त्यावर उपाय शोधणे आणि तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर करणे यांसारखी कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.

विज्ञानाधारित विचारांना चालना
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरत आहे. विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष प्रकल्पांच्या स्वरूपात साकारता येतात. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांच्या प्रयोगांमधून नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःच्या ज्ञानात भर घालण्याची संधीही मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com