

भिवंडीत समाजवादी पक्षाच्या
सहा नगरसेवकांची हकालपट्टी
भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून समाजवादी पक्षात खळबळ उडाली आहे. पक्षाचा आदेश डावलून भाजपचे आमदार महेश चौघुले यांचे समर्थक भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी बुधवारी (ता. १४) हा निर्णय जाहीर केला. हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये गटनेते आरिफ याकूब शेख, काशफी शाफ मोमिन, आजीब जमाल मोमिन, अन्सारी शबाना शमीम, शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम आणि खान अमान उबैद यांचा समावेश आहे.
भिवंडी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी समाजवादी पक्षाने दिलेला पक्षादेश नाकारून या सहा नगरसेवकांनी भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस केली. जंगलानी हे भाजपचे आमदार महेश चौघुले यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्याने समाजवादी पक्षात नाराजी निर्माण झाली. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. अशी कृती पक्ष कधीही खपवून घेणार नाही. स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निर्णयाविरोधात पक्ष कायदेशीर लढा देईल, असे शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.