आज मुंबईत स्वामी स्वरूपानंद यांच्याशी विशेष माध्यम संवाद; चिन्मय मिशनच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा जागतिक प्रभाव उलगडणार

आज मुंबईत स्वामी स्वरूपानंद यांच्याशी विशेष माध्यम संवाद; 
चिन्मय मिशनच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा जागतिक प्रभाव उलगडणार
Published on: 

चिन्मय मिशनची अमृत महोत्सवाकडे वाटचाल
गुरुवरी विशेष संवादाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली ७५ वर्षे कार्यरत असलेल्या चिन्मय मिशनचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त गुरुवारी (ता. १५) मुंबईत विशेष माध्यम संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी स्वरूपानंद हे गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये हा संवाद होणार आहे.

चिन्मय मिशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिन्मय अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष संवाद गुरुवारी प्रेस क्लबमध्ये रंगणार आहे. या संवादात मिशनच्या साडेसात दशकांच्या प्रवासाचा, जागतिक स्तरावरील कार्याचा आणि भावी वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे. आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जाताना वेदान्तातील प्राचीन ज्ञानाची उपयुक्तता काय आहे, यावरही या वेळी चर्चा होणार आहे. या संवादात चिन्मय मिशनचा जागतिक विस्तार, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाची समकालीन जीवनातील प्रासंगिकता, अमृत महोत्सवाचे स्वरूप आणि पुढील ७५ वर्षांसाठी संस्थेची दिशा अशा चार प्रमुख विषयांवर भर दिला जाणार आहे. मिशनच्या आध्यात्मिक कार्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि जागतिक स्तरावरील संवादाच्या उपक्रमांची माहितीही या वेळी दिली जाणार आहे.

दिल्लीत मुख्य सोहळा
चिन्मय मिशनच्या ७५ वर्षांच्या कार्यपूर्तीचा मुख्य अमृत महोत्सव २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात येणार आहे. मिशनची आध्यात्मिक परंपरा, जागतिक स्तरावरील योगदान आणि नव्या पिढीशी संवाद साधण्याचे प्रयत्न अधोरेखित केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com