महालक्ष्मी गडावर भक्तीचा जागर

महालक्ष्मी गडावर भक्तीचा जागर
Published on: 

महालक्ष्मी गडावर भक्तीचा जागर

देवीच्या दर्शनासोबतच आरोग्याचीही साधना

कासा (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी गडावर नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्रातील सलग नऊ दिवस पायी गड चढून देवीचे दर्शन घेण्याचा उपक्रम अनेक भाविकांनी सुरू केला आहे. तरुणांसह महिला आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांचाही यामध्ये सहभाग आहे. दररोज वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करून भाविक गडावर दाखल होत असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

महालक्ष्मी गडावर जाण्यासाठी सुमारे ८८५ ते ९०० पायऱ्या चढाव्या लागतात. पहाटे ५ वाजल्यापासून भाविक गडाच्या पायथ्याशी जमून चढाईला सुरुवात करतात. साधारण ४५ मिनिटांच्या चढाईनंतर मंदिरात पोहोचता येते. गडाकडे जाणाऱ्या मार्गाचे काम करण्यात आले असून, पायऱ्यांपर्यंत वाहनांची सुविधाही उपलब्ध आहे.

भक्तीसोबत आरोग्याची साधना

गड चढण्याच्या उपक्रमातून भाविकांना धार्मिक श्रद्धा जोपासण्यासोबतच शारीरिक व्यायामाची संधी मिळत आहे. पायऱ्या चढण्यासाठी लागणारी मेहनत, गडावरील थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे भाविकांना प्रसन्न अनुभव मिळतो. त्यामुळे नवरात्रातील हा उपक्रम भक्ती आणि आरोग्याची सांगड घालणारा ठरत आहे.

“नवरात्रानिमित्त आम्ही सलग नऊ दिवस गडावर जात आहोत. सुरुवातीला थोडा थकवा जाणवतो; मात्र गडावर पोहोचल्यानंतर थंड हवा आणि निसर्गसौंदर्य पाहून थकवा दूर होतो. देवीचे दर्शन घेतल्यानंतर मनाला परम आनंद मिळतो,” अशी प्रतिक्रिया भाविक प्रणव घारपुरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com