अंबरनाथमध्ये १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

अंबरनाथमध्ये १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या
Published on: 

अंबरनाथमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : अंबरनाथ पश्चिमेतील कोहोजगाव परिसरात १९ वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. अमित यादव असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमित हा कोहोजगाव येथील नाना पाटील प्राइड इमारतीच्या ए विंगमधील खोली क्रमांक २०१ मध्ये राहत होता. तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. भाऊ आणि मित्रासोबत तो या खोलीत राहत होता. बुधवारी (ता. १४) रात्री कामावरून घरी परतल्यानंतर त्याने जेवण केले. त्यानंतर तिघेही झोपले. गुरुवारी सकाळी अमितच्या भावाला जाग आल्यानंतर अमित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने तातडीने नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ पोलिसांना कळविण्यात आले. अमितने वायरच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी छाया रुग्णालयात पाठवला. अमित हा मूळचा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी मूळ गावी नेण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com