

उमरोली खुर्दच्या शाळेचा गौरव
मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा लोकसहभागातून कायापालट घडवून स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य परिसर साकारल्याबद्दल मुरबाड तालुक्यातील उमरोली खुर्द शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचा गौरव करण्यात आला. ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष गणेश भागोजी सुरोशे आणि मुख्याध्यापक विलास नारायण चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.
उमरोली खुर्द शाळेने ग्रामस्थ, ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी, सेवाभावी संस्था आणि शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा केली. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी समन्वय साधत विविध स्तरांवरून सहकार्य मिळवले. त्यामुळे दुर्गम भागातील शाळेच्या विकासाला गती मिळाली.
शाळेच्या गरजा ओळखून ग्रामस्थांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे, उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करणे आणि शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे, या समितीच्या कार्याची दखल घेण्यात आली. शासनाच्या मदतीसोबतच समाजाच्या सहभागातूनही शैक्षणिक परिवर्तन घडवता येते, हे शाळेने दाखवून दिले.
या गौरव सोहळ्याला आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार कुमार आयलानी, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या यशात मुख्याध्यापक, शिक्षिका अनिता भोंडीवले, मनोजकुमार पाटील, प्राजक्ता राठोड, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि सहकार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. या सन्मानामुळे उमरोली खुर्द गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, लोकसहभागातून शाळा विकासाचे हे उदाहरण इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.