

चणेरा-रोहा मार्ग महिनाअखेर पूर्ण
पाच वर्षांचा खोळंबा संपणार; प्रकाश विचारे यांच्या लढ्याला यश
रोहा, ता. १६ (बातमीदार) : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या चणेरा-बिरवाडी-पांगलोळी-उसरमार्गे रोहा रस्त्याचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील पवार यांनी लेखी आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
शासनाने या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले; मात्र उर्वरित ३० टक्के काम दीर्घकाळ प्रलंबित राहिले. त्यामुळे चणेरा परिसरातील अनेक गाव-वाड्यांतील नागरिकांना नादुरुस्त रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विचारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली. तसेच चणेरा नाक्यावर किमान चार वेळा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विभागाने उर्वरित काम मुदतीत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. हा मार्ग चणेरा, बिरवाडी, पांगलोळी व उसर परिसरातील अनेक गाव-वाड्यांना रोह्याशी जोडत असल्याने त्याचे काम पूर्ण होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीचे फलित
पाच कोटींचा निधी मंजूर असूनही रस्त्याचे काम पाच वर्षे रखडले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे होते; मात्र नागरिकांसाठी मला हा लढा द्यावा लागला. सुरेश मोरे, अनिल साळवकर, शंकर दिवकर, सरपंच अतिश मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी साथ दिली. काम पूर्ण होणे हा ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय आहे, असे प्रकाश विचारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.