

धुरामुळे प्रदूषणाची चिंता
धुराच्या उत्सर्जनाची तपासणी करण्याची मागणी
जव्हार, ता. १६ (बातमीदार) : रायतळे ग्रामपंचायत हद्दीतील एका खासगी कंपनीच्या धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. परिसरात लोकवस्ती, शाळा तसेच जव्हार–सेलवास हा आंतरराज्य रस्ता असल्याने धुराच्या परिणामांची तपासणी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कंपनीच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर आसपासच्या परिसरात पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करून उत्सर्जनाचे प्रमाण तपासावे आणि संबंधित कंपनीकडून प्रदूषणविषयक निकषांचे पालन होत आहे का, याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.धुराड्याची उंची वाढवणे किंवा धूर नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा बसवणे यांसारख्या उपाययोजनांचा विचार करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणेने तक्रारीची दखल घेऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही होत आहे.
“कंपनीच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर परिसरात पसरत असल्याचे दिसून येते. या भागात नागरिकांची वस्ती, शाळा आणि जव्हार–सेलवास हा आंतरराज्य रस्ता असल्याने या धुराचा नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांवर काय परिणाम होतो, याची तपासणी होणे आवश्यक आहे. प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची दखल घ्यावी. तसेच, आवश्यक असल्यास धूर नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत संबंधित कंपनीला निर्देश द्यावेत,” असे प्रवासी कौशल्या टोकरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.