

दोन दिवसांत ५२७ डॉक्टरांची नोंदणी
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कामकाजाला गती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दोन दिवसांत ५२७ हून अधिक डॉक्टरांची नोंदणी पूर्ण केल्या आहेत. यामध्ये ३३० तात्पुरत्या आणि १९७ कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय कदम यांनी दिली.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे कामकाज २०२२ पासून प्रशासकाच्या नियंत्रणाखाली होते. निवडणूक प्रक्रियेवरील वाद न्यायालयात गेल्याने परिषदेच्या निवडून आलेल्या मंडळाची स्थापना रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नऊ निवडून येणाऱ्या जागांसाठी निवडणुका झाल्या, मात्र पदसिद्ध सदस्यांच्या नियुक्त्यांना विलंब झाल्याने १८ सदस्यांचे संपूर्ण मंडळ २२ सप्टेंबरला कार्यरत झाले. डॉ. कदम यांनी कार्यभार स्वीकारला, तेव्हा २४९ तात्पुरत्या आणि ५६६ कायमस्वरूपी नोंदणी अर्ज प्रलंबित होते. नोंदणी अर्जाला कक्ष अधिकारी, उपनिबंधक, निबंधक आणि अध्यक्ष अशा चार स्तरांवर मंजुरी घ्यावी लागते. बहुतांश अर्ज अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून दोन दिवसांत ५२७ अर्जांचा निपटारा करण्यात आला.
६६ डॉक्टरांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात
नोंदणीतील विलंबाचा ३५० हून अधिक डॉक्टरांना फटका बसला. त्यापैकी २०२३-२४ च्या गटातील ६६ डॉक्टरांना पदव्युत्तर एमडी प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक प्रमाणपत्र नसल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. केंद्रीय महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स संघटनेचे (मार्ड) अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, संघटनेच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने या डॉक्टरांना निकालापूर्वी नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर सवलत दिली. आता त्यांनी नोंदणी पूर्ण करून गुणपत्रके मिळवणे आवश्यक आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़
परिषदेच्या कामकाजाला गती मिळाल्याने प्रलंबित नोंदण्यांचा निपटारा होऊन वैद्यकीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
- डॉ. संजय कदम अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.