

‘टाटा न्यू’वर आता जीवन विमा
ॲक्सिस मॅक्स लाइफची टाटा डिजिटलसोबत भागीदारी
नवी दिल्ली, ता. १६ : जीवन विमा अधिक सुलभ करण्यासाठी ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सने टाटा डिजिटलची उपकंपनी असलेल्या टाटा फिनटेकसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे टाटा न्यू या डिजिटल ॲपवर ग्राहकांना ॲक्सिस मॅक्स लाइफच्या निवडक जीवन विमा आणि दीर्घकालीन बचत योजना शोधता तसेच खरेदी करता येणार आहेत.
या सहकार्यामुळे ग्राहकांना दैनंदिन व्यवहारांसोबतच आर्थिक नियोजनासाठीही एकाच डिजिटल व्यासपीठाचा वापर करता येईल. कुटुंबाचे आर्थिक संरक्षण, दीर्घकालीन बचत आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विमा योजनांची निवड करणे अधिक सोयीचे होणार आहे.
ॲक्सिस मॅक्स लाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मदन म्हणाले, ‘‘टाटा डिजिटलसोबतची भागीदारी जीवन विमा अधिक सुलभ आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग आहे. टाटा न्यूच्या माध्यमातून ग्राहकांना संरक्षण आणि दीर्घकालीन बचतीचे पर्याय उपलब्ध करून देत त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास मदत होईल.’’
टाटा डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सजित शिवानंदन यांनी सांगितले, की टाटा न्यूवर ग्राहकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा सहज उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या भागीदारीमुळे संरक्षण आणि दीर्घकालीन बचतीच्या पर्यायांची व्याप्ती वाढेल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीवन विम्याची उपलब्धता वाढवणे आणि ग्राहकांना भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास मदत करणे, हा या सहकार्याचा उद्देश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.