

दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहूया!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : राज्यावर दुष्काळाचे संकट असताना शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बळीराजाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ठाण्यात केले. आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवाला भेट दिल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्यावर दुष्काळाचे संकट असताना शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. अशा परिस्थितीत समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने पुढे येत बळीराजाला मदतीचा हात द्यावा. राज्यातील जनतेच्या सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. जनतेची सेवा करण्यासाठी शक्ती मिळावी तसेच महाराष्ट्राचे कल्याण आणि राज्याचा विकास साधण्यासाठी काम करण्याचे बळ मिळावे, असे साकडे देवीला घातल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक व त्यांचे कुटुंबीय, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
…………………
………………
पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
ठाण्यातील हायलँड येथे भाजप पदाधिकारी नीलेश पाटील यांच्या नवरात्रोत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी आले होते. या वेळी प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. त्यावर लवकरच भेटू, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच तुझ्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी धीर दिला. या वेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.