

विक्रोळीत सासरवाडीत चोरी करणारा जावई अटकेत
दोन लाख २७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) : सासरवाडीत ये-जा करण्याचा फायदा घेत नातेवाइकांच्या घरातून सुमारे दोन लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या जावयाला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. विजय गुप्ता असे आरोपीचे नाव असून, तो भांडुप येथे राहतो. पोलिसांनी चोरीस गेलेले दागिनेही हस्तगत केले आहेत.
विक्रोळीतील टागोरनगर येथील इमारत क्रमांक १६ मधील फिर्यादीच्या घरातून सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान सोन्या-चांदीचे दागिने गायब झाले होते. फिर्यादी यांच्या पत्नीने हे दागिने पलंगात ठेवले होते. ते चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश जाधव (गुन्हे), पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. फिर्यादीच्या घरातील सदस्यांकडे चौकशी केली असता, विजय गुप्ता हा त्यांचा जावई असून, घरी ये-जा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासादरम्यान चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास विक्रोळी पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.