

झेंडूची बाजारपेठेत जोरदार विक्री
दसऱ्यानिमित्त फुलांना मोठी मागणी
स्थानिक उत्पादन घटल्याने नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर येथून फुलांची आवक; प्रतिकिलो ८० ते १०० रुपये भाव
कासा, ता. १८ (बातमीदार) : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी निर्माण झाली असून, बाजारपेठेत फुलांची जोरदार विक्री सुरू आहे. दसऱ्यानिमित्त घरे, वाहने, दुकाने आणि कार्यालयांच्या सजावटीसह पूजेसाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहे. यंदा स्थानिक शेतकऱ्यांकडील झेंडूच्या फुलांचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेची गरज भागविण्यासाठी नाशिक, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथून फुलांची आवक होत आहे.
डहाणू तालुक्यात पूर्वी अनेक शेतकरी झेंडूच्या फुलांची लागवड करीत होते. त्यामुळे दसरा आणि अन्य सणांच्या काळात स्थानिक बाजारपेठेतच मोठ्या प्रमाणात फुले उपलब्ध होत असत, मात्र यंदा स्थानिक उत्पादन कमी झाल्याने फुलांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आणि विक्रेत्यांना बाहेरील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, अन्य जिल्ह्यांतून आणलेल्या झेंडूच्या फुलांना स्थानिक बाजारपेठेत महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या दर्जेदार झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो ८० ते १०० रुपये भाव मिळत आहे. दसऱ्याच्या दिवशी फुलांची मागणी वाढत असल्याने विक्रेत्यांनी बाजारात फुलांची उपलब्धता करून दिली आहे. घरांच्या प्रवेशद्वारांवर तोरणे लावणे, वाहनांची पूजा करणे, दुकाने व कार्यालयांची सजावट करणे तसेच विजयादशमीच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फुलांच्या खरेदीला वेग आला असून, झेंडूच्या फुलांच्या विक्रीतून बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक उत्पादनात झालेली घट आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे बाहेरील जिल्ह्यांतून होणाऱ्या फुलांच्या पुरवठ्याला यंदा विशेष महत्त्व आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.