

मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : गावाला गेलेल्या रहिवाशाच्या बंद फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरी करणाऱ्या एका चोरट्याला सोसायटीतील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. मुरबाड शहराजवळील देवगाव ग्रामपंचायत हद्दीतील लंबोदर सागर सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. १६) ही घटना घडली. चोरी करण्यासाठी हे तिघे मुंबईहून मुरबाड येथे आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राहुल अक्षय जाधव (रा. पास्कलवाडी, मालाड, मुंबई) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, तसेच लोखंडी कटावणी आणि लहान-मोठे स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आले. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनायक जाधव दोन दिवसांपासून गावी गेले होते. त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसल्याने सोसायटीतील रहिवाशांना संशय आला. त्यांनी फ्लॅटजवळ धाव घेतली असता, आत असलेले तीन जण त्यांना धक्का देऊन पळून गेले. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी सोसायटीच्या वाहनतळात ठेच लागून पडलेल्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल जाधव याच्यासोबत असलेले रहीम पठाण (रा. गोवंडी) आणि बबलू (रा. चेंबूर) हे दोघे पळून गेले. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.