केईएम रुग्णालयात २१ ऑक्टोबरला माइंडफुलनेस कार्यशाळा; डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन

केईएम रुग्णालयात २१ ऑक्टोबरला माइंडफुलनेस कार्यशाळा; डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन
Published on: 

रुग्णसेवेच्या धावपळीत डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न

केईएम रुग्णालयात माइंडफुलनेस कार्यशाळा; डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.१९ : रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना अनेकदा मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. कामाचा वाढता ताण, दीर्घ कामाच्या वेळा आणि भावनिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात २१ ऑक्टोबरला ‘जागतिक माइंडफुलनेस दिना’निमित्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. दैनंदिन जीवनातील तणाव हाताळणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि कठीण परिस्थितीत मानसिक स्थैर्य राखण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तंत्रांची माहिती यावेळी दिली जाणार आहे. यात मन एकाग्र करणे, वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणे आणि परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे यांचा समावेश असेल.वैद्यकीय क्षेत्रात इतरांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनीही मानसिक स्वास्थ्यासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे या उपक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता केईएम रुग्णालयातील एमएलटी सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com