महिलांच्या स्वावलंबनासाठी राजिपचा पुढाकार

महिलांच्या स्वावलंबनासाठी राजिपचा पुढाकार
Published on: 

महिलांच्या स्वावलंबनासाठी राजिपचा पुढाकार
‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत स्त्रीशक्ती संघटन आणि संवाद; १६ हजार ५७९ महिलांचा सहभाग
अलिबाग, ता. १८ (वार्ताहर) : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत स्त्रीशक्ती संघटन आणि संवाद’ हा उपक्रम राबविण्यात आला. बुधवारी (ता. १४) झालेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील ६९२ ग्रामपंचायतींमधील १६ हजार ५७९ महिला आणि ९१२ ग्रामसखींनी सहभाग घेतला. या वेळी महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि ग्रामीण विकासातील महिलांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिकेत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी अभियानाच्या प्रगतीचा ऑनलाइन आढावा घेण्यात आला.
नेहा भोसले यांनी बचत गटांची स्थापना, महिलांचे संघटन, आर्थिक स्वावलंबनासाठी उपलब्ध संधी आणि ग्रामीण विकासातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. स्वयंरोजगार निर्मिती आणि शाश्वत विकासासाठी बचत गटांचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
प्रियदर्शिनी मोरे यांनी लखपती दीदी योजना, बँक खाती, वैयक्तिक कर्ज, पीएमएफएमई आणि बचतगटांच्या विविध आर्थिक उपक्रमांचा तालुकानिहाय आढावा घेतला. निर्धारित वेळेत उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अभियानातील अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी घनकचरा व्यवस्थापनातील स्वयंसहाय्यता गटांच्या योगदानाची माहिती दिली.

चौकट :
ग्रामपातळीवर संघटन
जिल्हा व तालुकास्तरीय व्यवस्थापक आणि प्रभाग समन्वयकांनी या उपक्रमाचे नियोजन केले. ग्रामीण महिलांना बचतगटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि विकासप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com