दुष्काळाच्या चाहुलीने तरुण सरसावले; दोन वनराई बंधारे उभारले

दुष्काळाच्या चाहुलीने तरुण सरसावले; दोन वनराई बंधारे उभारले
Published on: 

दुष्काळाच्या चाहुलीने तरुण सरसावले; दोन वनराई बंधारे उभारले

सावरपाडा, पासोडीपाड्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम

कासा,ता.१९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातच पाणीटंचाईची चाहूल लागल्याने आगामी उन्हाळ्यातील संभाव्य जलसंकटाचा सामना करण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते जयेश चौधरी यांच्या संकल्पनेतून सावरपाडा आणि पासोडीपाडा येथे दोन वनराई बंधारे उभारण्यात आले.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे भूजलपातळी वाढण्यास आणि स्थानिक जलस्रोतांना फायदा होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी वेळीच जलसंधारण करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमात जयेश चौधरी यांच्यासह प्रवीण ठाकरे, अविनाश मिसाळ, संदीप दळवी, नितीन ठाकरे, विनोद खानजोडे, अजय कानल, विनोद सावर, संदीप शिंगडा (बधा), महेश भगत, जिग्नेश कानल, अश्विन मोहनकर, आयुष मोहनकर, अमित वागलोडा, सखाराम कानल आणि मेहुल कोम यांनी सहभाग घेतला. बंधाऱ्यांसाठी आवश्यक पिशव्या उपलब्ध करून देत अजय कानल यांनी सहकार्य केले.ग्रामीण आणि आदिवासी भागांतील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जलसंधारण व लोकसहभाग महत्त्वाचा आहे. सावरपाडा आणि पासोडीपाड्यातील तरुणांच्या या उपक्रमातून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com