

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार!
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) ः विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांना दररोज सर्व विषयांच्या वह्या-पुस्तकांचे ओझे पाठीवर वाहून न्यावे लागत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास सहन करावा लागतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना स्कूल बॅग धोरण २०२० चे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही वर्षांत शालेय शिक्षणाचा भार वाढत असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. त्यात प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनाही दररोज सर्व विषयांच्या वह्या-पुस्तकांसह शाळेत यावे लागते. पाठीवर जड दप्तर घेऊन शाळेच्या इमारतीतील तीन ते चार मजले चढताना लहान मुलांची दमछाक होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या सूचनांमुळे विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक वह्या-पुस्तके वाहून नेण्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे, मात्र शिक्षण विभागाने केवळ पत्र पाठवून थांबू नये तर शाळांमध्ये जाऊन दप्तराच्या वजनाची आणि धोरणाच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिंदे सेनेचे उपशहरप्रमुख कौस्तुभ मोरे यांनी ही महापालिकेचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.