विद्यार्थ्यांनी घेतला न्यायव्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव

विद्यार्थ्यांनी घेतला न्यायव्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव
Published on: 

विद्यार्थ्यांनी घेतला न्यायव्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव
मुंबई उच्च न्यायालयाला शैक्षणिक भेट; गुरू नानक महाविद्यालयाचा उपक्रम
धारावी, ता. १९ (बातमीदार) : भारतीय न्यायव्यवस्था आणि संवैधानिक शासनप्रणालीची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने गुरू नानक महाविद्यालय (स्वायत्त), शीव येथील राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत राज्यशास्त्राच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील एकूण ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाची संकल्पना राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुमीत खरात यांची होती. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत उबाळे यांनी विशेष प्रयत्न केले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी न्यायालयीन कक्ष, न्यायाधीशांचे ग्रंथालय, उच्च न्यायालयाचे संग्रहालय आणि ऐतिहासिक न्यायालयीन कक्षाची पाहणी केली. या वेळी त्यांना न्यायपालिकेची कार्यपद्धती, न्यायिक प्रक्रिया आणि न्यायालयाचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेता आले. तसेच संविधानाचे संरक्षण आणि कायद्याचे राज्य कायम राखण्यात न्यायपालिकेची भूमिका जाणून घेण्याची संधी मिळाली.

संवैधानिक मूल्यांची जाणीव
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे आणि त्यांच्यात संवैधानिक जाणीव विकसित व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित सैद्धांतिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्यास ही भेट उपयुक्त ठरली. तसेच न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, संवैधानिक मूल्ये, लोकशाही आणि न्यायाचे महत्त्व यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली. नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी अशा उपक्रमांना महाविद्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com