

नवगावात भवानी माता मंदिराचे लोकार्पण
ग्रामस्थांच्या एकजुटीतून मंदिराचा जीर्णोद्धार
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) : अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे शिवज्योती मित्र व महिला मंडळाच्या पुढाकारातून भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या वेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, कामगार आघाडीचे नेते प्रदीप नाईक, उद्योजिका कविता सिंह, प्रमोद घासे, अरुण कवळे, सरपंच अंकिता जैतू, उपसरपंच तथा मंडळाचे उपाध्यक्ष निखिल कवळे, अध्यक्ष मधुकर घासे आणि सचिव समीर राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना नवगावच्या ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन एखादे काम हाती घेतल्यास ते यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या योगदानातून भव्य आणि सुसज्ज मंदिर उभारले जाणे ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत त्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.