वरपमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान कोयत्याने हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

वरपमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान कोयत्याने हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
Published on: 

वरप येथे गरब्यादरम्यान हल्ला;
आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : वरप गावात कोयते घेऊन आलेल्या तरुणांनी गोंधळ घालत दहशत निर्माण केल्याची घटना रविवारी (ता. १८) घडली. एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी तर, रिक्षा आणि कारच्या काचा फोडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वरप येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील मैदानात सार्वजनिक महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवात गरबा कार्यक्रमानंतर देवीचा होम सुरू होता. त्या वेळी म्हारळ येथील आठ जण तीन मोटारसायकलींवरून तेथे आले. त्यातील चौघांच्या हातात लोखंडी कोयते होते. त्यांनी आरडाओरडा व शिवीगाळ करत खुर्च्यांवर कोयते मारून गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी प्रतुष जाधव, विनायक मदने, रोशन चौधरी, दीपेश लोखंडे, महेश जैस्वार, आयुष पांडे आणि अन्य दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राहुल गोंधळे यांनी तरुणांना जाब विचारला असता, एकाने चेतन पाल याच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले. तसेच राहुल गोंधळे यांच्यावरही कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी घटनास्थळी उभ्या असलेल्या रिक्षा आणि कारच्या काचा फोडून नुकसान केले. यानंतर काही आरोपी मोटारसायकलींवरून म्हारळच्या दिशेने फरार झाले. तेथे नितीन चौधरी यांच्यावरही कोयत्याने हल्ला केल्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com